सांस्कृतिक योगदान


मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर हे महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या हडपसर कोंढवा मतदारसंघाचे आमदार म्हणून पद भूषवित आहेत.त्यांचा सामाजिक क्षेत्राशी असलेला नातं सर्वांना माहित आहेच.पण सामाजिक कार्य करत असताना त्यांनी सांस्कृतिक क्षेत्राशी पण नाळ जोपासली आहे.सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी युवा मोर्च्या च्या माध्यमातून बरेच कार्यक्रम आपल्या विभागात घेतले असून आता देखील ते सांस्कृतिक कार्य चळवळीला नेहमीच प्रोत्साहन देत असतात. भारतीय जनता युवा मोर्च्याच्या माध्यमातून "सीएम चषक" क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही एक सांस्कृतिक चळवळ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात गौरवली गेली.या स्पर्धेची सुरुवात हडपसर विधानसभा मतदारसंघात करण्यात आली.या स्पर्धेत विविध खेळांचे आयोजन अगदी यशस्वीरीत्या करण्यात आले.यात क्रिकेट,व्हॉलीबॉल, कबड्डी, खो- खो,१०० व ४०० मीटर धावणे, कुस्ती,कॅरम ,नृत्य,गायन,चित्रकला,रांगोळी या व यासारख्या अनेक स्पर्धांचा समावेश होता.संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेमध्ये सुमारे ४२ लाख खेळाडूंनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला ज्याची विक्रम म्हणून एक नोंद घेण्यात आली.

सामाजिक कार्याबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही आधार फाउंडेशनचे भरीव योगदान आहे. महिलांसाठी होम-मिनिस्टर या खेळाचे आयोजन करण्यात आले.सर्व महिलांना त्यांच्या घरगुती कामांमधून विरंगुळा मिळावा तसेच महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सर्व महिलांनी सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद लुटला. तसेच नवरात्री मध्ये महा भोंडल्याचे आयोजन अखिल साईनगर -गोकुळनगर सेवा समितीच्या नवरात्र महोत्त्सवात करण्यात आले.आधार फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल विविध उत्सवांमध्ये असते. बालमंडळींसाठी बाळमेळावा ज्यामध्ये विविध छोट्या छोट्या खेळांचे आयोजन करण्यात येते. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.विविध कलागुणांना वाव देण्यासाठी रांगोळी स्पर्धा व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येते.तरुणाईला शारीरिक आरोग्यासाठी कराटे प्रशिक्षण वर्ग,तसेच ढोल,लेझीम स्पर्धा आयोजित करण्यात येतात.