सामाजिक योगदान


एकच लक्ष ३३ कोटी वृक्ष
वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, वृक्ष संवर्धन


वृक्ष लावूया, वृक्ष वाढवूया, प्रियजनांची आठवण कायम स्वरूपी जतन करूया
झाडे लावा, झाडे जगवापर्यावरणची हानी आणि ऱ्हास हा आत्ताच्या काळात वाढत चालला असून त्यासाठी वेळीच उपाय योजना नाही तर निसर्गाचा हिरवगार रूप आपणाला पुन्हा पाहावयाला मिळणार नाही. सध्या जग हे ग्लोबल वॉर्मिंग च्या दिशेने वाटचाल करत असून वेळीच त्याला रोखण्यासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन हे अत्यंत गरजेचे आहे.मा. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांनी देखील केंद्र सरकारच्या ''एकच लक्ष ३३ कोटी वृक्ष" या योजने अंतर्गत जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी लोकांना प्रवूत्त केले असून या योजने अंतर्गत हडपसर कोंढवा विधानसभा मतदार संघात त्यांनी वृक्ष लागवडीचे काम हाती घेतले आहे.जास्तीत जास्त वन उद्याने उभारून त्यांची देखभाल करणे हा हरित क्रांतीचा मंत्र त्यांनी जपला असून आत्तापर्यंत आनंदवन उद्यान एन आय बी एम रोड, हांडेवाडी वनउद्यान, काळेपडळ वनउद्यान यासारखी बरीच उद्याने त्यांनी उभारली आहेत.त्यासाठी लागणार निधी त्यांनी शासन दरबारी पाठपुरवठा करून मिळवला आहे.

आधार फाउंडेशन


मा. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांनी त्यांच्या तरुण वयात सामाजिक सेवेतूनच आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.घरात सामाजिक,राजकीय वातावरण असल्याने साहजिकच त्यांचा प्रभाव योगेश आण्णा यांच्यावर पडत गेला.त्यांनी राजकीय कारकिर्दीसोबत सामाजिक बांधिलकी देखील तेव्हढ्याच जोमाने जोपसली असून आजही त्यांचा सामाजिक कार्य हे नेहमीच इतरांना आदर्श देणारा ठरता. मा. श्री. योगेश आण्णा यांनी आधार फाउंडेशन या त्यांच्या सामाजिक संस्थेची स्थापना केली. जेणेकरून तळागाळातील गोर गरीब जनतेपर्यंत त्यांना त्यांचा कार्य पोचवता येईल. आधार फाउंडेशन च्या माध्यमातून योगेश आण्णा यांनी अनेक समजयोगी कामे केली असून आजही सुरु आहेत.

१० वी / १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.तसेच त्यांना अजून प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थ्यांना आधार पुरस्कार सुरु केला व शिष्यवृत्ती देखील सुरु केली.मागील ३ वर्षांपासून ७००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दप्तर वाटप व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.शिक्षणास प्रोत्साहन देणारे त्यांचे हे कार्य हे नेहमीच वंदनीय आहे. समाजातील गरजू महिलांकरिता उद्योग व्यवसाय म्हणून योगेश आण्णा यांनी आधार फाउंडेशन तर्फे लिज्जत पापड या नामवंत कंपनी मार्फत रोजगार केंद्र सुरु केले व आपल्या कार्यक्षेत्रातील १००० पेक्षा जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.तसेच आपल्या फाउंडेशन च्या माध्यमातून १३० महिला बचत गटांना पुरस्कार देण्यात आला.

योगेश आण्णा टिळेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील ३५०० हुन अधिक नागरिकांना आधार फाउंडेशन च्या माध्यमातून मोफत पॅनकार्ड वाटप केले. रेशनकार्ड व रहिवाशी दाखले जनतेला मिळवून देण्यासाठी योगेश आण्णा टिळेकर यांनी आधार फाउंडेशन तर्फे मदत केली. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा या वाक्यानुरूप नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत अशा रुग्णवाहिकेची सुविधा आण्णा टिळेकर यांनी सुरु केली.तसेच स्वाईन फ्लूचे मास्क जनतेला मोफत करण्यात आले. समाजातील महिलांना आधुनिक युगाची माहिती घेता यावी यासाठी आधार तर्फे मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले असून ५०० हून अधिक महिलांनी याचा लाभ घेतला आहे. माझी लेक योजना या संकल्पनेला अनुसरून योगेश आण्णा यांनी समाजकार्याला हातभार लावत जवळपास २१ कुटुंबातील मुलींच्या लग्नाला सर्वोतोपरी मदत केली. या संकल्पनेतून अण्णांच्या सामाजिक कार्याबरोबर माणुसकीचे देखील दर्शन यामधून घडते.

"स्वच्छ भारत" ही संकल्पना संपूर्ण भारतामध्ये अगदी यशस्वी पणे राबविली जात आहे.या योजने अंतर्गत संपूर्ण भारत देश हा लवकरच स्वच्छ आणि अजून सुंदर करता येईल यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. योगेश आण्णा टिळेकर यांनी देखील या स्वच्छतेच्या कार्याला आपला हातभार म्हणून आधार फाउंडेशन च्या माध्यमातून स्वखर्चातून दोन घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. तसेच दैनंदिन कचरायची विल्हेवाट नागरिकांना योग्य प्रकारे लावता यावी यासाठी त्यांनी घरोघरी आधार फाउंडेशन च्या माध्यमातून बकेट वाटप केले. योगेश आण्णा टिळेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील ३५०० हुन अधिक नागरिकांना आधार फाउंडेशन च्या माध्यमातून मोफत पॅनकार्ड वाटप केले.तसेच जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा या वाक्यानुरूप नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत अशा रुग्णवाहिकेची सुविधा आण्णा टिळेकर यांनी सुरु केली.

श्रीराम प्रतिष्ठान


मा. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त परिसरातील सुमारे २५०० माता भगिनींना संपूर्णपणे मोफत देवदर्शन सहल घडविण्यात आली.या सहलीमध्ये कोल्हापूर,ज्योतिबा,नृसिंहवाडी,सांगली गणपती चाफळ यासारख्या देवस्थानांचा समावेश होता. भजन मंडळांना साहित्य पुरवून सामाजिक मदतीबरोबर सांस्कृतिक आवड देखील योगेश आण्णा यांनी जोपासली आहे. श्रीराम प्रतिष्ठानमार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी भगवत गीता वाटप गेली २ वर्षे करण्यात येते व आषाढी वारी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी देखील मोफत शिबिरामार्फत घेण्यात येते.