राजकीय प्रवास

महाराष्ट्र राज्याच्या हडपसर कोंढवा या विधानसभेच्या मतदार संघामधून मा. श्री. योगेश आण्णा टिळेकर हे विद्यमान आमदार म्हणून काम पाहत आहेत. तसेच आमदार पद भूषविण्यापूर्वी त्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये सन २०१२ पासून नगरसेवक पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

सन 1996

सामाजिक कार्यकर्ता

सन 1998

चिटणीस भा.ज.पा. युवा मोर्चा पुणे कॅंटोन्मेंट

सन 2000

चिटणीस भा.ज.पा. युवा मोर्चा पुणे कॅंटोन्मेंट

सन 2005

सरचिटणीस भा.ज.पा. हडपसर विधानसभा

सन 2007

अध्यक्ष आधार फाऊंडेशन

सन 2007

अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठान

सन 2007

सरचिटणीस भा.ज.पा. पुणे शहर

सन २०१२

पुणे महानगरपालिका नगरसेवक-कोंढवा प्रभाग

सन २०१४

महाराष्ट्र विधानसभा - हडपसर मतदारसंघ आमदार

सन २०१५

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

राजकीय कारकीर्द


राजकीय प्रवासाला सुरुवात


घरात सामाजिक तसेच राजकीय वारसा असल्यामुळे लहान वयात मा. आ. श्री. योगेश टिळेकर हे राजकारण या विषयाकडे वळले. एक पक्षाचा सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून सन १९९६ मध्ये त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला.एक सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्यावर सोपवलेली संपूर्ण जबाबदारी अतिशय उत्तमरीत्या पेलली तसेच पक्ष बांधणीला मदत करून युवा वर्गाला सोबत घेऊन सामाजिक, राजकीय काम करणं सुरूच ठेवला. पुढे त्यांना १९९८ साली भाजप युवा मोर्चा पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड च्या चिटणीस पदाची जबाबदारी मिळाली.भाजप पक्षाशी असलेला त्यांचा नातं अधिकाधिक दृढ होत गेला. मा. श्री. योगेश टिळेकर यांनी भैरवनाथ पतसंस्थेची स्थापना सन २००० मध्ये केली. या पतसंस्थेचा सेक्रेटरी पद त्यांनी भूषविले. पक्षाने त्यांना २००५ साली भाजप हडपसर विधानसभेचा सरचिटणीस पद बहाल केलं. सामाजिक भान असणाऱ्या योगेश आण्णा टिळेकर यांनी २००७ साली आधार फाउंडेशन व श्रीराम प्रतिष्ठान या दोन सामाजिक संस्था निर्माण केल्या.या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून समाजात अनेक सामाजिक कार्य त्यांनी केली व अजूनही चालू आहेत.२०१० मध्ये त्यांना पुणे शहर भाजप चे सरचिटणीस पद मिळाले. त्यांची सामाजिक कार्याची ओढ आणि राजकारणाशी त्यांचे असलेले नाते या जोरावर त्यांना युवा मोर्चा चा राज्याचा नेतृत्व करण्याची संधी पुढे मिळाली. आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहून, पक्ष श्रेष्ठींचा आदेश पळून काम करणं हे मा. श्री.योगेश आण्णा टिळेकर यांनी उत्तम पार पडला.पुणे महानगरपालिका नगरसेवक-कोंढवा विभाग


मा. श्री. योगेश आण्णा टिळेकर हे सन २०१२ रोजी पुणे महानगरपालिकेवर कोंढवा विभागाचे नगरसेवक म्हणून प्रथम निवडून आले.सन २०१२ पासून २०१७ पर्यंत त्यांनी नगरसेवक हे पद भूषवलं आहे.आपल्या नगरसेवक कारकिर्दीत त्यांनी आपल्या प्रभागामध्ये सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून लोकांच्या हिताची कामे त्यांनी पूर्ण केली आहेत.आदर्श नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा पुणे महानगरपालिकेवर उमटवला असून त्यामुळेच त्यांना हडपसर विधानसभा २०१४ ची उमेदवारी जाहीर झाली.नगरसेवक म्हणून कार्यरत असताना आपला प्रभागाचा कसा विकास करता येईल याकडे त्यांनी सतत लक्ष दिले.महाराष्ट्र विधानसभा - हडपसर मतदारसंघ आमदार ( सन २०१४ ते चालू वर्ष )


२०१४ साली झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मा. श्री. योगेश टिळेकर यांनी विजय मिळवत हडपसर मतदार संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ते ५ वर्ष अगदी योग्य प्रकारे सांभाळत आहेत.आपल्या या ५ वर्षांच्या आमदार पद कालावधीमध्ये त्यांनी आपल्या मतदार संघासाठी भरघोस निधी प्राप्त करून घेतला आणि त्या निधी मधून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये विकासकामे पूर्ण केली आणि काही कामे अजून देखील चालू आहेत.आपली कारकीर्द त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली असून हडपसर वासियांची सेवा करणं हाच त्यांचा ध्यास आहे.भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष


महाराष्ट्र राज्य हे भारतातील एक मोठ्या राज्यांपैकी एक मानले जाते. या अशा राज्यात तरुण मुलामुलींची संख्या देखील जास्त आहे.त्यामुळे भारतीय जनता पक्षाने या तरुणाईचे नेतृत्व या मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांना करायची संधी मिळाली आणि आजही ते त्याची धुरा अगदी चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत.युवा मोर्चा चे नेतृत्व करताना अनेक तरुणांना आपल्या सोबत घेऊन चालणे हे खूप महत्वाचे काम ते योग्य प्रकारे करत ससून तरुणाईचा आवाज ते सरकार पर्यंत पोचवत आहेत.