परिचय


लहान वयापासून घरात सामाजिक तसेच राजकीय वातावरणात वाढल्यामुळे मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर हे आज त्यांची राजकीय कारकीर्द सर्व परिस्थितींवर मात करून पुढे चालवत आहेत. घरात आजोबांपासून काका तसेच त्यांच्या मात्रोश्री यांचा सामाजिक व राजकीय वारसा योगेश आण्णा यांना मिळाला असून त्यांनी तरुण वयात राजकारणात प्रवेश केला. एक पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता ते एक यशस्वी तरुण आमदार अशी त्यांनी आपली ओळख जनतेमध्ये निर्माण केली.

मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर हे महाराष्ट्र राज्याच्या हडपसर - कोंढवा विधानसभेचे विद्यमान आमदार म्हणून पद भूषवित आहेत. मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांनी कायम जनतेचा विकास ह्याच ब्रीदवाक्याचा मनात विचार करून त्यादृष्टीने विकासकामे केली आहेत. पुण्यासारख्या सांस्कृतिक, शैक्षणिक वारसा लाभलेल्या शहरात योगेश आण्णा हे वाढले असून सदैव लोकांसाठी झटत राहून समाजकारण आणि राजकारण याची उत्तम प्रकारे सांगड घातली आहे.

मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर, भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार, ज्यांना प्रेमाने " आण्णा " म्हणून संबोधले जाते. गेली अनेक वर्षे राजकीय ,सामाजिक, वर्तुळात सक्रिय असणारे मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे हडपसर मतदारसंघाचे आमदार या नात्याने गेली ५ वर्ष अतिशय उत्तमरित्या नेतृत्व करत आहेत. आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता, पुढे वॉर्ड अध्यक्ष, पुणे महानगरपालिका नगरसेवक-कोंढवा विभाग ते अगदी भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ही सर्व पदे मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांनी आपल्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत भूषवली आहेत.

मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांच्या संपूर्ण कुटुंबाला सामाजिक, तसेच राजकीय पार्श्वभूमी लाभलेली आहे. योगेश आण्णा यांचा जन्म हा शेतकरी कुटुंबामध्ये झाला. कोंढवा गावातील प्रसिद्ध वस्ताद अशी त्यांच्या आजोबांची गावात ओळख होती. दलित समाजाची ७० एकर जागा टिळेकर यांच्या कुटुंबाकडे कसण्यासाठी होती. त्यातली अर्धी जागा ही आजोबांच्या नावावर होती. उरलेली ३५ एकर जागा ही दलित बांधवांची असून ती त्यांना परत मिळाली पाहिजे या हेतूने योगेश आण्णा यांच्या आजोबांनी जमीन परत केली. त्यांच्या या निर्णयाने पुढील पिढी ही प्रभावित झाली आहे. मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांचे काका भगवानराव टिळेकर हे कोंढवा गावचे उपसरपंच होते. तसेच त्यांच्या आई या सन १९९४ साली ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला कोंढवावासियांचे भरभरून प्रेम मिळाले. पुढे कोंढवा हे गाव पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत आल्यावर याच प्रेमाच्या जोरावर त्यांच्या आई या दोनवेळा पुणे महानगपालिकेच्या कोंढवा येथील नगरसेवक झाल्या. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून करणारे मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर आज जनतेच्या मनातले आमदार म्हणून त्यांचा काम करत आहेत.

राजकीय कारकीर्द घडवत असताना अनेक चढ उतार मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांच्या आयुष्यात येत गेले. त्यांच्या वडिलांना याच कालावधीत देवाज्ञा झाली. तसेच विरोधकांकडून अतिशय बिनबुडाचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. परंतु या परिस्थितीसमोर डगमगून न जाता जनतेच्या कामासाठी कसे प्रयत्न करता येतील तसेच विकासकामे कशी पूर्ण करता येतील याचा त्यांनी विचार केला आणि त्याचे फळ त्यांना लोकांच्या प्रेमातून मिळत राहिले आणि यापुढे मिळत राहील. विधानसभेतील तरुण तडफदार आमदार अशी ओळख मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांनी निर्माण केली आहे. लोकांमध्ये राहून, त्यांच्या विकासाची कामे कशी पूर्ण करता येतील याचा विचार सातत्याने योगेश आण्णा करत असतात आणि राज्य सरकार कडे त्याचा पाठपुरावा करत असतात. सन २०१४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांना भारतीय जनता पक्षा कडून हडपसर कोंढवा मतदार संघामध्ये निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी विजय प्राप्त करून हडपसर मतदार संघाला नवीन ओळख प्राप्त करून दिली. गेल्या ५ वर्षामध्ये मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांनी अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. तसेच अनेक कामे अजून सुरु आहेत.